पुनरीक्षण समितीवरील शैक्षणिक संस्थाचालक रूस्तम केरावाला यांची नियुक्ती रद्द

0

मुंबई – शाळेच्या शुल्कवाढीच्या संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यासाठी शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या पुनर्निरीक्षण समितीतून शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी रूस्तम केरावाला यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी हे आदेश दिले.

शाळेच्या शुल्क वाढीसंदर्भात शिक्षण विभागाकडे पालकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ ची अंमलबजावणी करताना अधिनियमात काही उणिवा आढळल्या. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिनियमात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुनरीक्षण समिती गठीत करण्याचे आदेश दिले. या समितीवर पालक आणि शैक्षणिक सस्थांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले. शैक्षणिक संस्था चालकांच्या प्रतिनिधींमध्ये सुनावणीसाठी विबग्योर शाळेचे रूस्तम केरावाला यांना संधी देण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली केरावाला यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्याचे सूत्रांनी सांगितले.