कल्याण । नवी मुंबई येथील सिव्हील इंजिनिअर असलेले रोहित फडतरे बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीने पुना लिंक रोडवरून जात असताना एका 45 वर्षीय महिलेच्या दुचाकी गाडीने त्यांच्या चारचाकी गाडीला धडक दिली यात जखमी झालेल्या महिलेला फडतरे हे उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना अपघाता नंतर जमलेल्या जमावाने फडतरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या गळ्यातील चैन आणि रोख रक्कम देखील या जमावाने लांबविली. दरम्यान या प्रकरणी फडतरे यांच्या तक्रारी वरून रायभोळे यांच्यासह त्याच्या तीन साथीदारावर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावाच्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या फडतरे यांच्यावर ऐरोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्यांची चौकशी पूर्ण झालेली नसल्यामुळे इतर आरोपीची नवे समजू शकलेली नाहीत मात्र त्यांच्या चौकशी नंतर आरोपीची ओळख पटवून कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.डी.गदादे यांनी सांगितले.