पुनावळेत आठ लाखांची घरफोडी

0
पुनावळे : दरवाजाचा कुलूप-कोयंडा उचकटून चोरट्यांनी शयनगृहाच्या कपाटामधील 8 लाख 5 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 6 सप्टेंबर रोजी पुनावळे येथे दिवसाढवळ्या घडली. याप्रकरणी वैभव गोरक्षनाथ वाघ (वय 31, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव वाघ यांचे गुरूवारी दुपारी दीड ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत घर कुलूप लावून बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील 8 लाख 5 हजार 800 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.