नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सोशल मीडियावर 10 एप्रिल रोजीच्या ‘भारत बंद’ चे मेसेज व्हायरल होत होते. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये हिसंक व अनुसुचीत प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भारत बंदला बिहार, पाटणा, मुझफ्फरनगर, शेखपूरसह अनेक राज्यांमध्ये समर्थकांकडून दुकाने व वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदच्या निषेधार्थ दगडफेकीच्या घटना समोर येत आहेत. तसेच आरामधील श्री टोला येथील बंद समर्थकांकडून गोळीबार करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
भारत बंदचे मेसेज व्हॉट्सअॅपवर वेगाने फिरत आहेत. यानंतरच गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र भारत बंदची जबाबदारी कोणत्याही संघनेने अध्याप स्वीकारलेली नाही. गृहमंत्रालयाकडून पहारा वाढवण्याचे आदेशही देण्यात आले असून, यात सार्वजनिक मालमत्तेचेे कोणतेही नुकसान होऊ नये, अशीही सूचना देण्यात आली आहे. यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनाच जबाबदार धरले जाणार आहे.