नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार सभा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यात सभा घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी मी महराष्ट्रात येत असल्याचे सांगितले आहे. मोदींनी स्वत: ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. ‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय’असे मोदींनी ट्वीट केले आहे. बुधवारी गोंदियात त्यांची सभा होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. वर्ध्यातील मोदींच्या पहिल्या सभेला अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
या सभेत प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे, उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे उपस्थित राहणार आहेत.