पुन्हा एकदा मोबाईल रिचार्ज दर पुन्हा वाढण्याची शक्यता

0

नवी दिल्ली: देशातील टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसापूर्वी आपले टॅरिफचे दर वाढवत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली होती. पुन्हा एकदा टॅरिफचे दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरुन काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यात येण्याची शक्यता आहे.

टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरुन काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणं आवश्यक असल्याचे मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक जनरल राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले आहे. यासोबत, प्रतिग्राहक सरासरी महसूल 200रुपये इतका वाढवणं गरजेचं आहे असंही ते म्हणालेत. तसंच सीओएआयने, युजरला गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे यासाठी निश्चित करण्याची मागणी ट्रायकडे केली आहे.

फ्लोर प्राइस निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्राय सध्या याप्रकरणी समभाग धारकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे, त्यानंतरच दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.