लॉस एंजेलिस : ब्लॉकबस्टर फ्रॅन्चाईजी वॉल्ट डिज्ने कंपनीने ‘पाइरेट्स ऑफ कॅरेबियन’ दुसऱ्यांदा सुरू करण्याचे ठरवले आहे. स्टुडिओच्यावतीने चित्रपटासाठी ‘डेडपूल’च्या लेखन टीममधील रेट रीस आणि पॉल वेरनिक यांच्याशी बातचीत केली आहे.
‘पाइरेट्स ऑफ कॅरेबियन’चे निर्माता जॅरी ब्रखमेर हेच या चित्रपटाचे निर्माता असणार आहेत. याच्यामध्ये फिल्म फ्रॅन्चाइजीच्या पहिल्या पाच चित्रपटात जॅक स्पॅरो ही व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेता जॉनी डेप यांच्या नावाचाही समावेश आहे.