पुन्हा एकदा व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला !

0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या व्यंगचित्रामुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात असता. राजकीय भाष्य त्यांच्या व्यंगचित्रातून ते करीत असतात. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत. १० टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असे व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला आहे.