पुन्हा एकदा ८५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडणार महानायक

0

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनयासोबतच सामाजिक भान जपतानाही दिसून येत असतात. अनेकदा गरजुंच्या मदतीसाठी धावून येत असतात. काही दिवसांपूर्वीच बिग बींनी ३५० शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत योगदान दिलं होतं. यापाठोपाठच आता आपण उत्तर प्रदेशमधील ८५० शेतकऱ्यांचं कर्ज फेडत असल्याचे बच्चन यांनी नुकतंच जाहीर केलं आहे.

महाराष्ट्रातील ३५० शेतकरी ज्यांना हे कर्ज फेडता येणं शक्य नव्हतं. त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडू नये म्हणून त्यांची कर्ज फेडली होती. आता उत्तर प्रदेशमधल्या ८५० शेतकऱ्यांची यादी आली असून त्यांना ५.५ कोटींचं आर्थिकसहाय्य महानायक करणार आहेत.