शोपियान: जम्मू काश्मीरमधील शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेली ही दिवसभरातील तिसरी चकमक आहे. सुरक्षा जवानांनी परिसर सील करुन सर्च ऑपरेशन सुरु केले असता ही चकमक उडाली होती. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.
दरम्यान आज गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दलीपोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. मात्र, चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान देखील शहीद झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले होते.