पुणे- पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.