मुंबई: केंद्रीय गृहमंत्री भाजपचे नेते अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहे. कलम ३७०वर अमित शहांचे व्याख्यान सुरु आहे. यावेळी अमित शहा यांनी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि निवडणुकीनंतर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता येईल आणि ती पूर्ण बहुमतात येईल असा दावा अमित शहा यांनी केला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या युती संकटात असल्याचे संकेत दिसून येते.
आज अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्याने युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याआधी कलम ३७० रद्द करण्यावरील विषयावर त्यांचे व्याख्यान सुरु असताना अमित शहांनी राज्यात भाजपची सत्ता पूर्ण बहुमतात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असा दावा केला आहे.
एकीकडे शिवसेना पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल असे सांगत आहे, दरम्यान अमित शहा यांनी पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री फडणवीस होईल असे सांगितले आहे.