पुन्हा राजकीय भूकंप; अजित पवारांनी दिला राजीनामा !

0

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद !

मुंबई: राज्याच्या राजकारणाला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वेग आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. बहुमत निवड चाचणी देवेंद्र फडणवीस यांची मोठी परीक्षा ठरणार आहे. उद्या ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र तत्पूर्वी आज अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. भाजपसाठी सर्वात धक्कादायक बाब आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहे. राजकीय घडामोडी पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करण्याचा दावा करणार की बहुमत सिद्ध करता येणार नसल्याने राजीनामा देणार? हे पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होईल.