पुरंदर एअरपोर्टसाठी काही दिवसातच भू संपादनाची प्रक्रिया सुरु होईल – मुख्यमंत्री

0

पुणे : पीएमआरडीए हद्दीत पुरंदरचा विकास वेगाने होतो आहे. पुरंदर एअरपोर्टसाठी भू संपादनाचे मॉडेल तयार असून काही दिवसातच पुरंदर एअरपोर्टसाठी भू संपादनाची प्रक्रिया सुरु होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील महाळुंगे माण हाय – टेक सिटी नगररचना योजना क्र १ या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीचे आयुक्त किरण गीते, आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे शहराचा रिंगरोडचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असताना, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येताच pmrda ची स्थापना करण्यात आली. त्या नंतर रिंगरोडच्या कामाची गती वाढली असून हा रिंगरोड पुणे शहराच्या विकासाला आधिक गती देणारा ठरणार आहे. तसेच रिंगरोड चा पहिला टप्पा ३२ किलोमीटरचा असून त्याला देखील गती देण्याचे काम केले आहे. असेही  मुख्यमंत्री म्हणाले.