पुरंदर विमानतळाबाबत तिसरा अहवाल सादर

0

पुणे । पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे संरक्षण विभागाच्या विमान उड्डाणांना अडथळा येत नाही ना, याबाबत एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीकडून तिसर्‍यांदा तांत्रिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे़ सुरक्षितेला कोणताही धोका पोहचत नसल्याने पुरंदर आणि लोहगाव या दोन्ही विमानतळांचे अस्तीत्व राहू शकते, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.दरम्यान, मधल्या काळात पुरंदर येथील श्री छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सध्या प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेत पुन्हा काही बदल होण्याची शक्यता होती. लोहगाव विमानळावरून दररोज नागरी विमानांची 120 आणि लष्काराची 8 उड्डाणे दररोज होत असतात़ मुंबईच्या सुरक्षितेच्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही़ तर पुरंदर विमानतळामुळे देखील काही धोका उद्भवणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात पुरंदरचे काम प्रगतीपथावर असणार आहे़

दोन हेक्टर जमिनीचे संपादन
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 2 हजार हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातील वाघापूर, राजेवाडी, आमडे या गावांच्या परिसरातील जाग निश्‍चित केली होती. परंतु, येथील शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर ही जागा कुंभारवळण, खानवडी, पारगाव, मेमन, वनापुरी या परिसरात हलविण्यात आले. या जागेचा अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षण करून अंतिम अहवाल शासनाला व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहेत.