सासवड । पुरंदर तालुक्यात आगामी काळात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील हजारो तरुणांना नोकर्या उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे चांगल्या पदावर नोकरी मिळण्यासाठी उच्च शिक्षण पूर्ण करावे. सध्या, या प्रकल्पाला जो विरोध होत आहे, तो सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून नव्हे तर राजकीय आणि स्वतःच्या हितासाठी विरोध केला जात आहे, त्यामुळे नागरिकांनी त्या गोष्टी फारशा विचारात घेऊ नयेत, अशा शब्दांत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विरोधकांनी फटकारले.
वनपुरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या चारही वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला. यानिमित्त राज्यमंत्री शिवतारे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवतारे म्हणाले की, शिक्षणाबरोबरच खेळाचाही चांगला समन्वय साधला जात असल्यानेच ग्रामीण मुले दर्जेदार यश प्राप्त करीत आहेत.
यावेळी दत्ता काळे, दिलीप यादव, राजाभाऊ झेंडे, रमेश इंगळे, रामदास मेमाणे, सरपंच विद्या महामुनी, उपसरपंच तुकाराम महामुनी, संजय कुंभारकर, वर्षा कुंभारकर, मुख्याध्यापिका लता बोकड, स्मिता खेडेकर, नामदेव कुंभारकर, पोलीस नवनाथ कुंभारकर, विजय कुंभारकर, भीमराव कुंभारकर, सुदाम कुंभारकर, उमेश मगर, गणेश शिंदे, जनार्धन कांबळे तसेच इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्याध्यपिका लता बोकड यांनी केले.
शिक्षक तुकाराम मुळीक यांनी आभार मानले.