मुक्ताईनगर- तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील पंक्चरच्या दुकानाजवळ एक पुरूष जातीचे 35 ते 40 वर्ष वयोगटातील अनोळखी मृतदेह 3 नोव्हेंबर रोजी दुपारी आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. पुरनाड फाट्यावरील राजस्वामी या पंक्चरच्या दुकानाजवळ 3 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पुरूष जातीचे 35 ते 40 वर्ष वयोगटातील मृतदेह आढळला. या प्रकरणी विनोद देशमुख यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार शैलेश चव्हाण करीत आहे. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन मुक्ताईनगर पोलिसांनी केलेले आहे .