मुक्ताईनगर । तालुक्यातील पुरनाड शिवारातील शेतात काम करीत असतांना 52 वर्षीय मजुराचा मळणी यंत्रात हात गेल्याने गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 7 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पुरनाड येथील शेतात तुकाराम शंकर तायडे (वय 52) हे सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मळणी यंत्रावर काम करीत असतांना अचानकपणे त्यांचा हात यंत्रात जावून गंभीर दुखापत झाली.
याप्रसंगी सोबत काम करीत असलेल्या इतर मजुरांनी धावपळ करीत त्यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निवृत्ती कोळी (रा. मेंढोळदे) यांच्या खबरीवरुन मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्युची नोेंद करण्यात आली आहे. तपास हवालदार नामदेव चव्हाण करीत आहे.