कटक : भारत आणि विंडीज संघात तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज रविवारी सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य ठरत ठरला. विंडीज संघाची सावध सुरुवात झाली. मोठी धावसंख्या उभारणे विंडीज संघाला अवघड असतानाच निकोलस पुरन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्या दमदार खेळींच्या जोरावर विंडीजने भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान ठेवले. पुरनने ६४ चेंडूंत ८९ धावांची खेळी साकारली तर पोलार्डने ५१ चेंडूत ७४ धावांची उत्तम साथ दिली.
भारताकडून शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी पहिली सहा षटके टाकली. त्यानंतर सातव्या षटकात सैनीला पहिले षटक टाकण्याची संधी देण्यात आली. सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले.