दक्षता समितीची बैठक
नंदुरबार : पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामे वेळेत पूर्ण करावेत. कामे करताना एकमेकांवर बोट ठेवून कामे करू नका. कामांमध्ये शिस्त आणा.अन्यथा, कार्यमुक्त होण्यास तयार रहा अशी तंबी तहसीलदार नितीन पाटील यांनी दिली
दक्षता समितीची बैठक आज 21 जानेवारी रोजी तहसीलदार नितीन पाटील यांच्या दालनात पार पडली. त्यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.