यावल। येथील तहसिल कार्यालयात पुरवठा विभागातील भ्रष्टाचार वाढला असून त्यास आळा घालून पुरवठा अधिकारी मातेकर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना आरपीआय आठवले गटातर्फे जिल्हा युवा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी निवेदन दिले आहे.
तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात मागासवर्गीय गोरगरीब कुटूंबाकडून एक शिधा पत्रिका बनवून देण्यासाठी मातेकर व डोळे हे प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करित आहे. रहिवास नसताना राजस्थानी काठेवाडी, मध्यप्रदेशातील नागरिक नियमात नसताना मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन रेशनकार्ड दिले गेले आहे. या आवारात दलालांचा सुळसुळाट आहे. पुरवठा विभागातील मातेकर यांना विचारणा केली असता ते अरेरावीची भाषा करतात. तरी या अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तायडे यांनी केली आहे.