रावेर । महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या रावेर नगरपालिका स्तरीय दक्षता समितीवर अशासकीय सदस्यपदी खानदेश माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरलीधर भागवत महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.
महाजन यांचे आमदार हरिभाऊ जावळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, चंद्रकांत अग्रवाल, शकुंतला महाजन, एल.डी.निकम, बाबलुशेट नागरिया आदींनी अभिनंदन केले.