जळगाव । जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचे बंधु आणि रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी प्रेमानंद हरी महाजन यांना शासनातर्फे कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देण्यात आले. राज्यपाल सी.विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत
पुरस्कारात मिळालेली पन्नास हजार रुपयाची रक्कम महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. राज्यातील सहा जणांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांपैकी एकमेव महाजन यांनी ही रक्कम मदत म्हणून जमा केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. प्रेमानंद महाजन यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.