पिंपरी- चांगल्या कार्याची दखल घेत सेवाभावी संस्था पुरस्कार देवून आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात. मात्र, या पुरस्काराचे मोल कमी होईल, असे कृत्य आपल्या हातून कधीही घडू देवू नका, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. आषाढीवारीनिमित्त आळंदी देवाची येथील संत मोतीराम संस्थानच्यावतीने वारकरी संप्रदायाचे प्रचार व प्रसार कार्य प्रभावीपणे करणार्या व्यक्तींना संत मोतीराम महाराज पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास लांडे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते.
हे देखील वाचा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, परभणीचे खासदार बंडू जाधव, पुण्याचे कृषी उपसंचालक पांडुरंग शिगेदार, एम. एम. सी. सी. चे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, आर्यन स्टील बोर्डाचे अध्यक्ष बी. आर. देशमुख, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, ज्ञानसाधना अॅकॅडमीचे संचालक भूषणराव कदम, नरेंद्र चव्हाण, विठ्ठल कदम, मारुती आवरगंड आदी उपस्थित होते. यावेळी अंगद महाराज दरडवाडीकर, प्रकाश महाराज जवंजाळ, मारोती महाराज थोरात, लोकेश चैतन्य महाराज, संदीपान महाराज शिंदे, राम महाराज मिरखेलकर, वेदांताचार्य विवेकानंद महाराज शास्त्री, कृष्णा महाराज लांबे, अंजनी जगताप, योगिराज महाराज गोसावी, पंकज महाराज गावडे यांना यावेळी पुरस्काराने गौरवण्यात आले. मंचकराव पौळ, विठ्ठल कदम, संभाजीराव पौळ, मारुती आवरगंड आदींनी संयोजनात पुढाकार घेतला.