नवी दिल्ली । अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जेव्हा बेमबेम देवीला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी सांगितली, तेव्हा बेमबेम देवी काही क्षणासाठी निःशब्द राहिली व तिच्या डोळ्यातून गालावर आनंदाश्रू वाहू लागले. त्यानंतर ओईनाम बेमबेमदेवीने आपले स्वप्न व कारकीर्दीच्या काळात आलेल्या सामाजिक अडथळ्यांबाबत आपल्या भावना मोकळ्या केल्या.
माझा हा अर्जुन पुरस्कार मी देशातील प्रत्येक महिलांना समर्पित करते, असे ती म्हणाली. हा क्षण माझ्यासाठी अतिशय विशेष असून मी आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. लहानपणापासून मी अर्जुन पुरस्काराबाबत ऐकत आले.