पुराचा फायदा उचलत आरोपी बेड्यांसह फरार

0

नगर । मुसळधार पावसामुळे नगरमधील पूरपरिस्थितीचा फायदा उचलत पाथर्डी बलात्कार गुन्ह्यातीलतील आरोपी बेड्यांसह फरार झाला आहे. भय्या उर्फ मोईन गुलाब शेख असं या आरोपीचं नाव आहे. तो पाथर्डी तालुक्यातील असून त्याच्यावर बलात्कार आणि अपहरणाता गुन्हा दाखल आहे.

शेखला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या सोबत दिनेश पालवे नावाचा आणखी एक आरोपी देखील होता. सुनावणीनंतर परतताना मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. आरोपीला ज्या एसटीतून पार्थडीला आणण्यात येत होते ती एसटी तब्बल अडीच तास या वाहतूक कोंडीत अडकली होती. यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी एसटीतून खाली उतरला.