पुरातन निंबाचे झाड कंटेनरवर कोसळले

0

पिंपळनेर। येथील साखर भवनजवळ असलेले निंबाचे झाड अचानक कंटेनरवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सामोडा रोडवरील साखर भवन जवळ खुप जुने निंबाचे झाड होते. हे झाड रस्त्यालगत होते. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पिंपळनेर शहरात पाऊस सुरू असल्याने झाड कोसळले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कंटेनरच्या दर्शनी भागाचे झाले नुकसान
साक्री येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी लागणारे साहित्य पोहचवून कंटेनर (क्र. एमएच 06-एक्यू 4274) हे साक्री येथून मुंबई() येथे जात होते. हे कंटेनर खाली होते. निंबाचे झाड कंटेनरच्या दर्शनी भागावर रात्री 8 वाजता पडल्याने त्या भागाचे नुकसान झाले असल्याचे वाहनचालक मोहम्मद जललुद्दीन (रा. फतेहपुर, उत्तरप्रदेश) यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश खटकळ, दिपक माळी, भूषण वाघ, शेखर वाडेकर, पंकज वाघ, शेखर देशमुख, असई रणधीर घटनास्थळी दाखल झाले.