जळगाव । अयोध्यानगर जवळील लक्ष्मीनारायण नगरात राहणारा तरूण हेमंत अरूण वाणी हा तीन दिवसांपुर्वी नाल्याला पुर आला होता. नाल्यात पाय घसरून वाहून गेला होता. तीन दिवसांपासून अद्याप तो मनपा कर्मचार्यांसह आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांनी शोध घेतल मात्र मिळून आला नाही. गरूवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे येथील नाल्याचा मोठ्या प्रमाणावर पुर आला होता. त्यावेळी हेमंत वाणी यांनी चार ते पाच विद्यार्थ्यांसह महिलांची मदत करत नाल्याच्या पुलावरून जाण्यास मदत केली होती. हे मदत कार्य करीत असतांना त्यांचा अचानक पाय घसरल्याने तो नाल्यात पडून वाहून गेला होता. नाल्यात वाहून गेल्याने मनपा कर्मचार्यांनी घटनास्थळापासून ते पाचकिलोमिटरपर्यंत शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.