भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलिसांची कारवाई ; आरोपी गजाआड
भुसावळ– अप पुरी-अहमदाबद हावडा एक्स्प्रेसमधून रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीनुसार एक लाख 87 हजार 820 रुपये किंमतीचा 18 किलो गांजा पकडला. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली तर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्गचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पंचन स्वाईन चिंतामणी स्वाईन (24, रा.बालागड, जि.गुंजाम, ओरीसा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.