पुरी-ओखामधून आठ लाखांचा गांजा जप्त

0

भुसावळ- पुरी-ओखा एक्स्प्रेसच्या एसी-2 या डब्यात बेवारस आठ बॅगांमध्ये सात लाख 60 हजार रुपये किंमतीचा 76 किलो गांजा आढळून आला. आरपीएफला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री भुसावळ ते जळगाव दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरपीएफ जवान आर. एन. पाटील, प्रमोद सांगळे, आर.व्ही.वाघ व आर.आर.जाधव यांनी सोमवारी रात्री 7.45 वाजता भुसावळ ते जळगावपर्यंत संपूर्ण गाडीची तपासणी केली. एसी बी-2 या डब्यात आठ बॅगा बेवारस स्थितीत आढळल्याने त्या बॅगा जप्त केल्या. आरपीएफ जवानांनी पंचांसमक्ष बॅगा उघडल्या. एका बॅगेत चार किलो, तर दुसर्‍या बॅगेत तीन तर अन्य बॅगांमध्ये एक किलो वजनाचे 30 गांजाचे पॅकेट सापडली. त्याची बाजारातील किंमत 7 लाख 60 हजार रुपये आहे. आरपीएफने बेवारस जप्त केलेल्या बॅगा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केल्या.