पुरी स्थानकावरील तांत्रिक कामांमुळे आठ प्रवासी गाड्या रद्द

0

भुसावळ- पुरी रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकींग व यार्ड रीमोल्डिंगच्या कामांमुळे 14 ते 24 सप्टेंबरदरम्यान अप-डाऊन मार्गावरील आठ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द
12 ते 19 दरम्यान अप 18405 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस तर डाऊन 18406 अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस 14 ते 21 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 12994 पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस 17 ते 24 दरम्यान व डाऊन 12993 गांधीधाम-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस 14 ते 21 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 22974 पुरी-गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेस 15 ते 22 दरम्यान तसेच डाऊन 22973 गांधीधाम-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस 12 ते 19 दरम्यान व अप 12146 पुरी-एलटीटी सुपरफास्ट 18 रोजी तसेच डाऊन 12145 एलटीटी-पुरी सुपरफास्ट 16 रोजी रद्द करण्यात आली आहे.