पुणे । सर्व महाविद्यालयांमध्ये आता पुरुषोत्तमचे पडघम वाजू लागले आहे. यात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांचे प्रवेश अर्ज गुरूवार (3 ऑगस्ट) सायंकाळी 6 ते 8 दरम्यान शनिवार पेठेतील नातू वाडा येथे स्विकारले जाणार आहेत.
महाविद्यालयीन कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांना उत्कृष्ट व्यासपीठ मिळून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रीय कलोपासक पुणे च्या वतीने प्रतीवर्षी पुरुषोत्तम करंडकचे आयोजन करण्यात येते. पुणे केंद्राची यंदा 8 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान प्राथमिक फेरी रंगणार आहे. त्यासाठी महाविद्याविद्यालयांना 3 ऑगस्टपर्यंत प्रेवश अर्ज भरून प्रवेश निश्चित करावायचा आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सर्व महाविद्यालयांना अनुक्रमे क्रम देण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता संघाची यादी जाहीर करण्यात येणार आहे. पुणे केंद्राची अंतीम फेरी 9 व 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर विजेत्या एकांकिकेचे छायाचित्रीकरण 11 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.