प्रतिभा पाटील यांनी केले गावातील महिलांचे कौतूक
पुरुषोत्तमनगर येथे गरजू लोकांना संसारोपयोगी वस्तू वाटप,
शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबीर
शहादा – महिला सामाजिक, राजकीय जबाबदार्या खुप चांगल्याप्रकारे सांभाळू शकतात याचे उदाहरण ग्रामीण भागातील पुरुषोत्तमनगर येथील महिला ग्रामपंचायतीचे देता येईल. त्यांनी केलेले काम उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांनी ग्रामपंचायत पुरुषोत्तमनगर येथे केले. तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे गरजू लोकांना संसारोपयोगी वस्तू वाटप, शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. संपूर्ण महिला ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात गौरव असलेल्या पुरुषोत्तमनगर येथे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हूणन जिल्हा सत्र न्यायाधिश यांच्या पत्नी वाघवसे, शहादा तहलिसदार यांच्या पत्नी मोनाली खैरनार, सातपुडा कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, कंचनबेन पाटील, सरपंच ज्योतीबेन पाटील, आरती पाटील, सुरेखा मराठे, रंजना पाटील, वंदना चव्हाण, संगिता पाटील, रत्ना पाटील तसेच सुश्रृत नर्सिग होमचे डॉ.बी.डी.पाटील, विस्तार अधिकारी सुरेश देवरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील, ग्रामसेवक शरद पाटील आदींची उपस्थिती होती.
ऊसतोड महिलांना मदत करण्याचे केले आवाहन
कार्यकारी संचालक पी.आर.पाटील म्हणाले, खूप लांबून ऊस तोड कामगार आपल्या परिसरात ऊस तोडणीसाठी येत असतात. उन्हातान्हात थंडीवार्यात त्यांच्याकडे तोडक्या निवार्याची सोय असते. अशा वेळेस त्यांना खुप कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. यासाठी त्यांची जितकी सेवा होईल तितकी देण्याचा प्रयत्न कारखाना, ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी केला जातो. यातून त्यांचा पुर्ण संसार भागेलच असे नाही. त्यांच्या कष्टाचे ते कमवितात. परंतू ते सर्व गोष्टी या ठिकाणी आणू शकत नाही, विकतही घेवू शकत नाही. म्हणून अशा वेळेस त्यांना अशा वस्तूंची नितांत गरज असते यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुत्रसंचलन व आभार ग्रामसेवक शरद पाटील यांनी व्यक्त केले.