शहादा (बापू घोडराज)। येथील 13 व्या विद्रोही साहित्य संमेलनात 23 व 24 डिसेंबर या दोन दिवसात पार पडलेल्या परिसंवादातून मोठ्या प्रमाणावर पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यात आला. त्यातून उपस्थितांना मोठ्या प्रमाणावर वैचारिक मेजवानी अनुभवता आली. संमेलनाच्या समारोपात 11 ठराव पारित करण्यात आले. यात विविध मागण्यांचा समावेश आहे. रविवारी गटचर्चा झाली. आज बहुजन समाज शिक्षण पासून वंचित आहे. अंधश्रद्धा, विषमतेमुळे विकास साध्य नाही. प्रतिगामी शक्ती हे वृक्ष तोडण्याचे काम करीत असल्याचे मत साहित्यिक बाबुराव गुरव यांनी मांडले.
शिक्षणावरील खर्चात तफावत
महात्मा फुले यांनी तय काळात स्त्रीयांना त्या काळात स्री यांना केंद्र बिंदु मानीत शिक्षणाच्या प्रवाहत आणले आहे. मुलभुत हक्कासाठी वीर खाज्या नाईक, कै. अंबरसिंग महाराज यांनी चळवळ केली आहे. चळवळीतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अकेडमित उभे राहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. मनुस्मृति व भीम स्मृति वादी संघर्ष वाढत आहे. भारतातील अनेक राज्यांपैकी केरळ सोडल्यास शिक्षणावर सहा ते आठ टक्के खर्च केला जातो. शिक्षणावर खर्चाची तफावत असल्याने बहुजनाच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवले जाते असे बाबुराव गुरव यांनी म्हटले. यावेळी साहित्यिक कॉ. नजुबाई गावित, कविवर्य वाहरु सोनवणे, अरविंद कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, आरती पवार, प्रा. मनोज गायकवाड़ यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.
पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित यावे
शहादा । अध्यक्षीय समारोपात संमेलन अध्यक्षा नजुबाई गावीत म्हणाल्या की, देशातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित येण्याची गरज आज निर्माण झाली आले .तरुणांनी लेखनाकडे वळून आपले दुःख व आपले जगणं साहित्यातून मांडले पाहिजे. विद्रोही, दलित, आदिवासींचे साहित्य हे वास्तववादी साहित्य असते. त्याला अनेक आयाम असतात. साहित्यातून इतिहासाची निर्मीती होत असते. त्यामुळे आपण सर्वांनी लिहिते व्हायला पाहिजे. मूडनाडू चिंन्नास्वामी यांनी समारोप सत्रात इंग्रजीतुन आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून देशातील धार्मिक दहशतवाद व राष्ट्रभक्तीच्या विषयावरून सुरू असणार्या असहिष्णुतेवर मते व्यक्त केलीत सोबतच देशात अभिव्यक्ती स्वातंत्रची गळचेपी सरकारकडून चालवली जात आहे. कार्याध्यक्ष धनाजी गुरव हे आता पर्यत झालेल्या संमेलनातीळ सर्वात यशस्वी संमेलन असल्याचे सांगत संयोजन समितीचे आभार मानले. ठरावाचे वाचन नरेंद्र महिरे यांनी केले.प्रास्ताविक विनायक सावळे यांनी केले.सूत्रसंचालन विजय वळवी यांनी केले तर रवि मुसळदे यांनी आभार मानले. समारोप सत्राला विचार मंचावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव,सचिव गौतम कांबळे,जालिंदर घिगे,डॉ बाबुराव गुरव ,अरविंद कुवर,वाहरू सोनवणे,रंजना कान्हेरे,दीनानाथ महानोर, प्रा रणजित परदेशी,अशोक राजवाडे,प्रा सुधीर अनवले, प्राचार्य विश्वास सायनागावकर,प्राचार्य विजयकुमार जोखे,आदींसह संयोजन समितीचे पदाधिकारी व कारकर्ते उपस्थित होते.
विषमता विकासात अडसर
येथील मीरा प्रताप लॉन मध्ये तेरावे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन संमेलनात दुसर्या दिवशी गटचर्चा व मांडणी या सत्राचे सत्राध्यक्ष साहित्यिक बाबुराव गुरव हे होते. लोकशाहिर आण्णा भाऊ साठे विचार मंचावर प्रा. श्रीरंजन आवटे (पुणे ), के. डी. शिंदे, कॉ. अविनाश कदम ( मुंबई ), प्रमोद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक बाबुराव गुरव यांनी म्हटले की, आज बहुजन समाज शिक्षण पासून वंचित आहे. अंधश्रद्धा, विषमतेमुळे विकास साध्य होत नाही. प्रतिगामी शक्ती हे वृक्ष तोडण्याचे काम करीत आहेत. या भूमित श्रमवाद व ब्राह्मण वाद ही हजारो वर्षापासून सुरु आहे. समानता, मानवता, बंधुत्व मानणारा श्रमवाद आहे तर वेदांती सुप्त पुरुषातून आलेले वेद् ग्रंथ हा ब्राह्मणवाद आहे. या वादाला छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील राज्यभिषेक वेळीस अनुभवास आलेले आहे. त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. अवैधिक आणि वैधिक संघर्ष समजूत घेतला पाहिजे. कॉ. शरद पाटील यांना तीन वेळीस मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांना व त्यांचे साहित्य यांना समजून घेतले तर श्रमण संस्कृतीचे जतन करु शकतो. महावीर व गौतम बुद्धांच्या मांडणीत श्रवण संस्कृती आध्यात्मिक मांडणी आहे. या दोघांनी अहिंसेची संस्कृती दिली आहे. सातपुडा पर्वत रांगेतील असो वा इतरत्र वास्तव्यास असलेला आदिवासी हा पशुला माननारा आहे मात्र पुरातन काळापासून इतरांनी पशुला होम हवन व बळी म्हणून वापर केलेला आहे.
साहित्य संमेलनात करण्यात आलेले अकरा ठराव असे
शिशूवर्गापासून ते सर्व प्रकारच्या उच्चशिक्षणात समाजासाठी घातक असलेली ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक व इतर विषमता पोषक मूल्ये वगळावीत. त्यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी व एक सल्लागार समिती नेमावी. शिणावरील होत असलेला आत्ताचा दोन टक्के खर्च छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श नजरे समोर ठेवून एकूण बजेटच्या 16टक्के करावा.
अ.भा मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देऊ नये. घामाचा एकही रुपया अ. भा. साहित्य संमेलनाला देऊ नये. तसेच अ.भा.सारखे संमेलन सोडून इतर संमेलने निकोप पद्धतीने व्हावीत यासाठी चर्चा संघटित करावी.
भारत सरकारच्या वतीने दिल्ली येथे होणारा ‘रावण दहना’चा कार्यक्रम ताबोडतोब बंद करावा.देशातील मोठी सर्व धर्मिक स्थळे आणि त्यांची संपत्ती व जमीन यावर सरकारने नियमन व नियंत्रण करणारी यंत्रणा निर्माण करावी.
साहित्य आणि कला क्षेत्रावर अलिकडे सेन्सॉरशीपच्या नावाखाली सरकारी निर्बंध आणि प्रतिगामी संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. या विरोधात अवाज उठवणार्या सर्वांच्या सोबत विद्रोही आहे.
आदिवासी आणि त्यांच्या नेत्यांनी भारतीय स्वांतत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन तसे साहित्य शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात यावे. लढ्याच्या सर्व ठिकाणी आदिवासी संस्कृतीला स्वातंत्र्य लढातील यागेदानाला साजेसे स्मारक उभे करण्यात यावे. उदा. सातपुड्यातील आंबापाणीची-लढाई, रावलापाणीचे रामदास महाराजांच्या चळवळीचे स्मारक. राघोजी भांगरे बंडकरी परंपरेचे स्मारक त्यांच्या
जन्मगावी ठाणे येथे जिथे फाशी दिली तिथे व्हावे. हनुमंत नाईक यांचे चदंनापुरी घाटातील स्मारक, भागोजी नाईक यांचे नांदुर शिंगोटे इत्यादी स्मारके
तृतीयपंथी, समलिंगी आणि उभयलिंगी व्यक्तिंना भेदपूर्ण आणि बहिष्कृत वागणूक मिळत आहे. याविरूद्ध सामाजिक न्यासाठी चालवलेल्या त्यांच्या चळवळीला विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन पाठींबा जाहीर करत आहे. आणि समाजाने त्यांनाएक ‘माणूस’ म्हणून मान्यता द्यायला हवी. आहे.
आदिवासी (अनुसूचित जमातीच्या) लोकांना वनवासी म्हणून हीनवणार्या व्यक्ती संस्था व संघटना यांच्यावर अॅट्रासिटी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे.
डॉ. दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासह देशभरातील कार्यकर्ते, पत्रकार आणि विचारवंतांच्या हत्येचा निषेध आणि धर्मांध आणि जातीयवादी खुन्यांना त्वरित पकडण्याची मागणी हे संमेलने करते आहे.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मंदिरातील पुजारी हे वारकरी संप्रदयातील असावेत, पुजेच्या वेळी संतांचे अभंग गायले जावेत, वारकरी परंपरेप्रमाणे पुजा करण्यात यावी.
हे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन काही मागण्याचा ठराव करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर हा फुले स्मृतिदिन हाच शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा. कबीर जयंती म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षता दिन म्हणून साजरा करण्यात यावा. गुरुपोर्णिमा नव्हे तर एकलव्य हुतात्मा दिन म्हणून पाळला जावा. बलिप्रतिपदा हा बळीराजा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा. शिवाजी महाराजांचा शो राज्याभिषेक हा जातिविरोधी दिन म्हणून पाळला जावा. 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्री मुक्तीदीन म्हणून साजरा करावा. सावित्रीबाई फुले जयंतीदिन हा भारतीय महिला शौर्यदिन म्हणून साजरा करावा. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून मराठी भाषेच्या विकासासाठी उपाययोजना अंमलात आणाव्या. विविध बोलीभाषा, आदिवासी व भटके-विमुे यांची भाषा आणि संस्कृती यांच्या अभ्यास व संशोधनासाठी शासनाने मंडळ स्थापन करावे.9 ऑगस्ट क्रांतिदिनासोबत विश्व आदिवासी गौरव दिन सर्व शासकीय व निमशासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा तसेच त्यादिवशी संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.