पुरोहितला आर्मीकडून 15 दिवसांची रजा मंजूर

0

मुंबई : कर्नल प्रसाद पुरोहीत यांना आर्मीकडून पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली आहे. प्रसाद पुरोहित साध्या वेशात न्यायालयात हजर झाले होते. सरंक्षण खात्याचे अनेक जवानही साध्या वेशात न्यायालयात आले होते. सरंक्षण खात्याच्या ताफ्यात कर्नल पुरोहित यांना कोर्टात आणले गेले. कमांडींग अधिका-याला ताफ्याचा प्रमुख बनवून फौजफाट्यासह पुरोहीत कोर्टात आले. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून होणार आहे. त्याला पुरोहित हजर राहणार आहेत.

पुरोहीत यांची प्रकरण खूपच संवेदनशील आहे. त्यांना मिळालेल्या जामिनानंतर त्यांना पुणे स्थित मिलिटरी इंटेलिजन्सच्या दक्षिणी कमांडमध्ये रिपोर्ट करण्यात आले. इथेच त्यांची अगोदर सर्व्हिस होती. ‘निलंबित’ कर्नल पुरोहीत सध्या डीव्ही अर्थात (शिस्त व दक्षता) निर्बंधात राहतील. या बॅनमुळे ते सर्व्हिसमध्ये तर असतील परंतु, कोणत्याही प्रकारच्या प्रमोशनसाठी ते अपात्र असतील.