पुर्वजांचा वैभवशाली इतिहास माहित व्हावा यासाठी पवार बांधवांचा मेळावा

0

चाळीसगाव । पुर्वजांच्या इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी आज चाळीसगावात पवार बांधवांचा मेळावा पार पडला. हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पाणीपतच्या लढाईत पवारांचे महाराजे श्रीमंत यशवंतराजे पवार यांच्या नेतृत्वात पवार सरदारानी लढाईत मोठी कामगिरी बजावली होती. त्यात काही पवार शुर पराक्रमी सरदाराना वीरगती आली तर सरदार महादेव राजे पवार हे जखमी झाले होते एवढ्या मोठ्या लढाईत पवारांनी पराक्रम गाजवले असल्याचे श्रीमंत धार पवार सामाजिक प्रतिष्ठान पुण्याचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांनी सांगितले.

इतिहासाबद्दल मार्गदर्शन : छत्रपती शिवाजी महाराज व कालीका माता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रीमंत धार पवार खांदेश सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झाडाचे रोप देवून सत्कार करण्यात आला. सागर पवार यांनी सांगितले की पवार घराण्यांनी पाणीपतच्या लढाईत मोलाची कामगिरी होती पवारांचे पुर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यात सरदार होते तर 5 पिढ्यांनी स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अब्दालीचे आक्रमण परतुन लावण्यासाठी पवारांचे महाराजे श्रीमंत यशवंतराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली या लढाईत ते स्वतः हा व अनोजीराजे पवार, दत्तोजीराजे पवार, अप्पाजीराजे पवार, निबाजीराजे पवार, नरसोजीराजे पवार, कर्नानीराजे पवार हे लढाईत कामी आले तर सरदार महादेवराजे राजे पवार व बरचसे पूर्वज जखमी देखील झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यभर कार्य पोहोचविणार
पवार घराण्याच्या पुर्वजाच्या शौर्याची माहिती महाराष्ट्र भर असलेल्या पवार घराण्यातील बांधवांना व्हावा यासाठी पुणे येथे श्रीमंत धार पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन करण्यात आली असुन या संस्थेच्या माध्यमातून सपूर्ण महाराष्ट्र भरातील पवार बांधवाचे संघटन करून त्यांना प्रगती पथावर नेण्यासाठी व त्यांना आपल्या पुर्वजांचा इतिहास माहित व्हावा यासाठी प्रयंत्न करत असल्याचे सागर पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरदेवळा संस्थान चे वंशज धैर्यशीलराजे
पवार होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगरदेवळा संस्थान चे वंशज धैर्यशीलराजे पवार, पुणे येथील सागर पवार, शेखर पवार, बाबाजी पवार, औरंगाबादचे सतीश पवार, धुळे चे जिजाबराव पवार, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक खांदेश विभागाचे सघटक शिवाजी पवार यांनी केले तर याप्रसंगी पुणे येथील उमेश वैद्य यांनी पवार घराण्याचा इतिहासाला उजाळा दिला. तर औरंगाबाद चे सतीश पवार, पुण्याचे बाबाकाका पवार, शेखर पवार, अमळनेरचे गणेश पवार, विनित पवार, नायब तहसीलदार विनीत पवार, मुबंई चे प्रफुल्ल पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बाळासाहेब पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी नामदेवराव पवार, सतीश पवार, गणेश पवार, भूषण पवार, नारायण पवार, .भिकन पवार, पद्मकार पवार, भगवान पवार, गोपाल पवार, विजय पवार, बापू पवार, बबलु, पवार ,हेमंत पवार आदींनी परिश्रम घेतले.