पुर्ववैमनस्यातून सहा वर्षाच्या बालकाची विहीरीत फेकून केली हत्या

0

नगरदेवळा। येथून जवळच असलेल्या मोहळाई (सोयगाव) येथे गुरूवार 24 ऑगस्ट रोजी सायं 4 वाजे दरम्यान रूपेश मलीराम गढरी (वय-6) ह्या पहिलीत शिकणार्‍या बालकास भाऊबंदकीतीलच चुलत काका ऋषीकेश दिपक गढरी परदेशी (वय-18) या आरोपीने विहिरीत फेकून हत्या केली असून या घटनेमुळे मोहळाई गाव सुन्न झाले आहे.

खालचे व वरचे असे दोन वेगवेगळे मोहळाई गाव हे एक पाचोरा तालूक्यात आहे तर एक सोयगाव तालूक्यात येते. त्यातील सोयगाव तालूक्यातील मोहलाईत आरोपी व पिडीत असून आरोपीने काल सायं 4 चारच्या सुमारास मयत बालकास गावातून सोबतीला नेताना व पाचोरा तालूका हद्दीतील मोहलाई शिवारातील विहिरीकडे जातांना गावातील महिलांनी पाहिले होते, नंतर सायं रूपेशच्या तपासानंतर हि माहीती मिळाल्यामुळे घरच्यांनी व गावकर्‍यांनी शंका येऊन विहिरीत पाहिल्याने हि दुर्दैवी घटना कळाली. दरम्यान आरोपी हा रात्री आठ वाजेपर्यंत नगरदेवळा बाजारपेठेत फिरत असल्याचे अनेकानी पाहिले व नंतर बांबरूड(महादेव) गावाजवळ पोलीसांनी त्यास पकडले. बालकाचे पाचोरा येथे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला. पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोयगाव पोलीसांतर्फे बनोटी पोलीस करीत आहेत.