पुलवामा हल्ला भालोद महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन रद्द

0

कार्यक्रमाचा खर्च शहीद निधीस देण्याचा निर्णय

भालोद- कला व विज्ञान महाविद्यालयाने स्नेहसंमेलनात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याने रद्द केले असून याबाबतची सूचना संस्थेचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ जावळे यांनी केल्यानंतर महाविद्यालय परीवाराने हा निर्णय घेऊन देशाबद्दलची आपली बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. जमा झालेला व सांस्कृतिक कार्यक्रमावरील होणारा खर्चाचा निधी एकत्र करून जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे सैनिक कल्याणा निधी म्हणून जमा करण्यात येईल, असे प्राचार्य डॉ.अजय कोल्हे यांनी सांगितले.

निधीचे केले संकलन
महाविद्यालयीन तरुण-तरुणींची समाज व देशाबद्दलची आपली जबाबदारी लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून त्यावर होणारा खर्च आणि विद्यार्थी-प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेली आर्थिक मदत एकत्र करून शहिदांच्या कुटूंबियांच्या उत्थानासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांना देण्यात येणार आहे. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ.जतीन मेढे, डॉ.के.जी.चौधरी, प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.गणेश चौधरी, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.डॉ.वर्षा नेहेते, प्रा.डॉ.दिनेश पाटील, भानू परतणे, प्रकाश चौधरी, जीवन झांबरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.