निगडीः ताथवडे व पुनावळेमधून जाणारा पुणे-मुंबई हायवेच्या अंडरपास पुलाची उंची वाढवावी म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, युवा नेते संदीप पवार, युवा नेते सागर ओव्हाळ, अनुप गायकवाड, स्वप्नील भांडवलकर आदी उपस्थित होते. या पुलाखाली पावसाचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचत होते. शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता ओलांडत असताना त्रासाला सामोरे जावे लागते. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.