पुलाजवळ अज्ञात युवकाचा मृतदेह

0
आळंदी : येथील नवीन पुलाजवळ अज्ञात युवकाचा मृतदेह मिळाला आहे, अशी  माहिती आळंदी पोलिसांनी दिली. पोलीस शिपाई विजय पाटील यांनी फिर्याद दिली. मृतदेहाचे वर्णन यामध्ये चेहरा गोल, उंची पाच फूट, अंगावर निळ्या रंगाचे टी शर्ट, पांढरी पॅन्ट परिधान केली आहे. मृताच्या नातेवाईकांनी आळंदी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. पोलीस हवालदार नितीन बनकर तपास करीत आहेत.