भुसावळ- पुष्पक एक्स्प्रेसच्या पँण्ट्रीकारमधील दोन विक्रेत्यांवर अवैध विक्रेत्यांनी ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडीने भुसावळ स्थानक सोडल्यानंतर काही अंतरावर घडली होती. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे लोहमार्ग पोलिसात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी भुसावळातील भारत नगरातील दोघा संशयीतांना गुरूवारी अटक करण्यात आली होती. आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर शनिवारी पुन्हा या आरोपींना दुसर्या गुन्ह्यात ताब्यात घेणार येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
एकाचवेळी दोन विक्रेत्यांवर ब्लेडने हल्ला
डाऊन पुष्पक एक्स्प्रेसने भुसावळ सोडल्यानंतर पँट्रीकारमधील कर्मचारी कमलकिशोर जयजयराम ठाकूर (लखनऊ, उत्तरप्रदेश) याच्यावर एस- 2 मध्ये तर विमलेश चेताराम ठाकूर (लखनऊ, उत्तरप्रदेश) याच्यावर एस- 3 बोगीत ब्लेडने संशयीत आरोपी हर्षल सुनील पाटील (21) व सोनू मोहन अवसरमल (22, दोन्ही रा.भारत नगर, भुसावळ) यांनी हल्ला करीत धोक्याची साखळी ओढत गाडी थांबवून पळ काढला होता. आरोपींना गुरुवारी एका गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर शनिवारीदेखील दुसर्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलिस सूत्रांनी सांगितले.