‘पुस्तक पेटी’चा अभिनव उपक्रम

0

पुणे : लहान वयातच मुलांवर वाचनाचे संस्कार घडवण्यासाठी व त्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने पुस्तक पेटी असा अभिनव उपक्रम पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागातर्फे राबविला जात आहे. विविध शाळांमध्ये पुस्तक पेटी योजनेद्वारे बाळगोपाळांची पुस्तकांशी मैत्री जुळली आहे. या उपक्रमांतर्गत विविध वयातील विद्यार्थ्याना पुस्तके वाचून दाखविली जातात. गेल्या वर्षांपासून काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. सुधीर इनामदार आणि डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून न्या. रानडे बालक मंदिर शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.