पुस्तक वाटप करून ईदच्या शुभेच्छा

0

दहिवेल । येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खान्देश युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणेता देसले यांच्यातर्फे ईदचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पहिला अभिनव उपक्रमाला सुरवात केली. ईदच्या शुभेच्छा देतांना महाराष्ट्रातील थोर पुरूषांचे पुस्तके वाटप करून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासह वाचण प्रेरणेचा संदेश दिला.

बंधूभाव वाढवावा
मुस्लीम समाजातील युवकांना महाराष्ट्रातील थोर पुरूषांच्या इतिहासाची व पराक्रमाची तसेच महाराष्ट्रातील थोर पुरूषांनी राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती व्हावी तसेच हिंदू व मुस्लीम बांधवांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करावेत तसेच बंधूभाव वाढवावा. प्रणेता देसले यांनी मुस्लीम बांधवांना पुस्तके वाटप केली.