ठाणे । यजमान जिंदाल स्टील- जिंदाल टेबल टेनिस अकादमीच्या पुनम यादवने चमकदार कामगिरी करत ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील सब ज्युनिअर मुलींच्या लढतीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. पुनमने स्पर्धेत आगेकूच करताना पहिल्या लढतीत सातव्या मानांकित अध्यश्री जोगवर 15-13, 11-9, 4-11, 11-5 असा विजय मिळवला. दुसर्या लढतीत खळबळजनक विजयाची नोंद करताना पुनमने दुसरे मानांकन मिळालेल्या निधी जगतापचा 11-3, 11-7, 4-11, 11-3 असा पराभव केला.
या गटातील अन्य लढतींमध्ये अव्वल मानांकित भाविका मुलरजानीने आठव्या मानांकित शर्वणी सांवतची लढत 11-5, 11-9, 11-8 अशी मोडून काढली. तिसर्या मानांकित तिया वाघने सहाव्या मानांकित अर्पिता जोशीवर आणि चौथ्या मानांकि आर्या सोनगडकरने पाचवे मानांकन मिळालेल्या मेघना करंदीकरचा सरळ गेममध्ये पराभव करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आघाडीचे खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली.