बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांची सुन्नी ईदगाह मैदानावर नमाज पठण ; देशात सर्वांना सुख, समृध्दी, शांती लाभू दे अशी केली प्रार्थना
जळगाव –सालाबादाप्रमाणे या वर्षीयी पवित्र सण बकरी ईदनिमित्ताने सोमवारी सकाळी 6 वाजता मुस्लिम बांधवांनी मौलाना जाबीर रजा रजवी यांच्या नेतृत्वात ईद उल अज हा बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी कोल्हापूर, सांगलीसह राज्यभरात पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त नागरिकांना धैय मिळू दे मदत मिळू यासह सर्व भारतीयांना सुख, समृध्दी, शांती लाभू अशी विश्वप्रार्थना करण्यात आली.
सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै.अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक करुन सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करुन सर्वांना ईदनिमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवून ईद साजरी करावी, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येवून सामुहिक प्रयत्न करावे असे आवाहन केले. यावेळी महापौर सीमा भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होती. तसेच मौलाना जाबी रजा, मौलना नजमुल हक मिस्बाही, मौलाना मतीन रजवी, मौलाना अलीम रजा, मौलाना हाशी हाजी मुख्तार शाह शेख युसूफ, उमरख, खान यांच्यासह पाच हजारापेक्षा अधिक मुस्लिम बांधव यावेळी हजर होते. अयाज अली. नियाज अली यांनी शेवटी उपस्थित मान्यवरांसह सर्वांच आभार मानले.
आपत्तीपासून देशाचे रक्षण कर
मौलाना नजमुल यांनी दुआ करतांना म्हटले की, अलाह बाढ से परेशान लोगो को राहत और मदत फरमा, म्हणजेच महापूरामधील नुकसानग्रस्तांना धैय व मदत मिळू दे. महापूर तसेच प्रत्येक नैसर्गिक आपत्ती व दहशतवाद यापासून देशाच्या बाहेरील व देशाच्या आतील शत्रूपासून देशासह देशवासियांचे रक्षण करत, सर्वांना सुख, समृध्दी, शांती लाभू दे अशी प्रार्थना केली. उपस्थित बांधवांनी याला प्रतिसाद दिला.