पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी केरळमध्ये दाखल

0

त्रिवेंद्रम – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळची पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी केरळला आहेत. यावेळी ते बचाव शिबिरात जाऊन नागरिकांची भेट घेणार आहेत.

केरळमधील महापूर हा शतकातील सर्वात मोठे संकट आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि प्राणहानी झाली. राज्यसरकारच्या आवाहनानंतर देशातून मदतीचा ओघ सुरू झाला. पण, हानी भरून निघण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. सध्या तिथे पुनर्वसनाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळला भेट देण्याचे ठरवले आहे. ते पुरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.