पूरग्रस्तांसाठी ए. आर. रेहमानचा प्रेरणादायी सॉंग

0

नवी दिल्ली: सध्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी जगभरातून असंख्य लोक मदत करत आहेत. अशातच ए. आर. रेहमान यांचं संगीत अनेकार्थाने श्रोत्यांना प्रेरणा देणारं ठरतं तर ए. आर. रेहमान यांनी आपल्या अनोख्या अंदाजात पूरग्रस्तांना सावरण्यासाठी प्रेरणादायी गाणं गायलं आहे.

केरळच्या नागरिकांना सध्या आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधाराचीही गरज आहे. रेहमान यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून लोकांना तो आधार आणि ती प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅलिफोर्नियातील एका कॉन्सर्टदरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यामध्ये ते ‘मुस्तफा, मुस्तफा’ या गाण्याचे बोल बदलून ‘केरला, केरला डोंट वरी केरला’ असं गाणं गायलं.

आता पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागले आहे. या पुरात २०० हून अधिक जणांचे प्राण गेले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरात जवळपास २० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या केरळला जगभरातून मदतीचा हात आहे.