पूरग्रस्त जिल्ह्यांची केंद्रीय पथकाकडून होणार पाहणी

0

मुंबई : राज्यातील सांगली,कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके येणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके आहेत.पाहणी करुन पुरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील.राज्यातील पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने 6,813 कोटींच्या मदतीचा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2 हजार 105 कोटी रुपये,असे एकूण 6 हजार 183 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता.त्यामुळे केंद्रीय पथकाकडून या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार आहे. यात कृषी विभागाचे आर. पी. सिंग, व्यय विभागाचे चित्तरंजन दास, ऊर्जा विभागाचे ओमकिशोर, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जैसवाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी. राजवेदी आणि जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे. हे पथक पूरग्रस्त भागाची चार दिवस पाहणी करणार आहेत.