मुक्ताईनगर प्रतिनिधी……
हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून धरण पाणलोट क्षेत्र सिमेवर असलेल्या गावांना आलेल्या पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढा घेतला असल्याने ऐनपूर, नायगाव, भोकरी, पातोंडी, मेंढोळदे यासह अन्य गावांना धोक्याची घंटा असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोघेही तालुक्यातील तहसीलदार तसेच महसूल प्रशासनाला सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील तातडीने येथे भेट देवून पाहणी केली. पाहणी करतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी नदी काठावरील नागरिकांना त्यांच्यावर आलेल्या या कठीणप्रसंगी मी आपल्या सोबत आहे चिंता करू नका असे आश्वासित केले.
दरम्यान,आ.पाटील यांनी याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भ्रमणध्वनी वरून सदरील गंभीर परिस्थितीच्या नुकसानी संदर्भात चर्चा केली. यावेळी ज्या गावांना पुराचा धोका आहे त्यांचे रेस्क्यू करून योग्य ठिकाणी हलवण्यात यावे अशी सूचना निंबोल येथे सोबत असलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली.