पूरनाडला नवजात मृत अर्भकाला सोडून मातेचे पलायन

0

मुक्ताईनगर:- तालुक्यातील पूरनाड येथे नवजात मृत स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची घटना 18 रोजी घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पूरनाड येथील बौद्ध वाड्यातील गटारीत नवजात मृत बालिका असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलीस पाटील शिवराम बेलदार यांनी मुक्ताईनगर पोलिसात माहिती दिल्यावरून नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत.